Tripur Purnima : रत्नागिरीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे भव्य दीपोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : दिव्यांची पौर्णिमा म्हणून ओळखली जाणारी ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव २०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा दीपोत्सव सोहळा ०५ नोव्हेंबर २०२५, बुधवार रोजी सायंकाळी ०७.३० वाजता रत्नागिरीतील शिवतीर्थ, मारुती मंदिर सर्कल येथे आयोजित करण्यात आला आहे.

भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसांचा वध करून मिळवलेल्या विजयाच्या आनंदात कार्तिक पौर्णिमेला हा दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. या मंगलमय सोहळ्यामध्ये समुहातील सर्व बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहून दीपोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीने केले आहे. अधिक माहितीसाठी ७०२००२४२४२ किंवा ९९२२४२९५७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 05/Nov/2025