“कांचन डिजिटल”तर्फे आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न!

◼️ छोट्या मावळ्यांच्या पालकांकडून स्पर्धेचे विशेष कौतुक

रत्नागिरी :- रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या “कांचन डिजिटल फोटो”तर्फे दिवाळीत घेण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला. यावेळी विजेत्या छोटे मावळे असलेल्या मुलांच्या पालकांनी कांचन डिजिटलच्या ह्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. प्रथमच स्पर्धा घेऊनही या स्पर्धेचा दर्जा उत्तम होता, असे पालकांनी आवर्जून सांगितले.

पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक प्राप्त सुयश रायकर ( पन्हाळा किल्ला – स्वस्तिक प्रतिष्ठान, वरचा फगरवठार ), द्वितीय क्रमांक प्राप्त ओम तोडणकर ( सिंहगड – कुर्ली-भाट्ये ) आणि तृतीय क्रमांक प्राप्त श्रीश डाफळे ( तोरणा किल्ला – वरचा फगरवठार ) यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर विशेष उल्लेखनीय पारितोषिक प्राप्त युवराज विभुते ( रायगड – परटवणे ), कोहिनूर हेरिटेज मित्रमंडळ ( सुवर्णदुर्ग – मांडवी रोड), तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त कोहिनूर ब्लॉसम सहकारी गृहनिर्माण सोसायटी-बंदररोड, सिद्धार्थ तोडणकर, कुर्ली यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभाला भैरी देवस्थान अध्यक्ष मुन्न शेठ सुर्वे, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ अध्यक्ष राजूजी कीर, रत्नागिरी माउंटेनर अध्यक्ष वीरेंद्र वणजू, अनबॉक्सचे संचालक गौरांग आगाशे, नाना पाटील आदी मान्यवरांसह मुकुंद विलनकर, विजय बासुतकर, शकील गव्हाणकर, मंथन मालगुंडकर, अजिंक्य सनगरे, श्रावणी मालगुंडकर आणि कांचन मालगुंडकर आदी उपस्थित होते. यावेळी सहभागी स्पर्धकांचे आभार मानत पुढीलवर्षीही ही स्पर्धा अशीच दिमाखदार पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे आयोजक कांचन मालगुंडकर यांनी जाहीर केले. समारंभाला स्पर्धक व त्यांचे परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 05-11-2025