राजापूर : रत्नागिरी जिल्हा नगर पालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त व राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पुणे महानगर पालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी कोल्हापूर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांची नियुक्ती झाली आहे.
तुषार बाबर हे गेली काही वर्षे रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नगर पालिका जिल्हा सहआयुक्त पदाचाही पद्भार होता. तर त्यांनी रत्नागिरी बरोबरच लांजा व राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदीही काम केले होते. गेले काही महिने त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा नगर पालिका जिल्हा सहआयुक्त या पदाबरोबरच राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पद्भार होता.
एक कर्तव्यदक्ष व जनतेसाठी काम करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख होती. जनतेशी निगडीत कामात कायमच तत्पर व काहीशी लवचिक भूमिका घेऊन त्यांनी काम केले. प्रशासकिय कामकाजातील परिपुर्ण माहिती असणारे व प्रशासनावर पकड असलेले अधिकारी अशीही त्यांची ओळख होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी जिल्हयातील नगर परिषदा व नगर पंचायतींच्या विविध विकास कामांना व त्यांच्या प्रस्तावांना गती देण्याचा प्रयत्न केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 05/Nov/2025














