लांजा : बेशिस्तपणे वाहन चालविणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात लांजा पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. ऑक्टोबर महिन्यात अशा ३४१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख ४७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत लांजात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्यामुळे दुतर्फा अरुंद रस्त्याच्या बाजूला नो पार्किंगमध्ये वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर लांजाचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार साक्षी भुजबळराव व पोलिस शिपाई किशोर पवार यांनी ३४१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 05/Nov/2025














