Ganja Case : खेडमध्ये दोन तरुणांना गांजासह सापळा रचून अटक

खेड : मुंबके ते कोरेगावदरम्यान गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. राहिद अब्दुल रऊफ जमादार (३५) आणि मुरसलीन बशीर नाडकर (३०, दोघे रा. संगलट मोहल्ला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. तपासादरम्यान दोघांकडून १६२ ग्रॅम गांजा (किंमत ₹२,४२५), दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य मिळून एकूण ₹२२,४४५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, याबाबत पोलीस शिपाई विजेंद्र सातार्डेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 05/Nov/2025

Shanti real estate 1