रत्नागिरी : देव्हारे ते मंडणगड जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन उभे करणाऱ्या चालकाविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वा. सुमारास करण्यात आली.
पर्शुराम असरफी (वय ६०, मूळ रा. उत्तर प्रदेश सध्या रा. मंडणगड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस उपनिरीक्षक विष्णू पारधी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित चालकाने आपल्या ताब्यातील अॅप टेम्पो (एमएच-०८-के-६३९७) हा देव्हारे ते मंडणगड जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर इतर वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने उभा केला होता. त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 06/Nov/2025














