रत्नागिरी : मंडणगड बाजारपेठेतील एका दुकानातून ३ हजार ५२० रुपये किमतीच्या तंबाखूची ३१ पाकिटे पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई मंगळवार दुपारी करण्यात आली. शशिकांत नामदेव कपडेकर (वय ५६, रा. भिंगळोली दापोली फाटा हॉटेल मंडणगड ढाब्यासमोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकान मालकाचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पो. काँ. अमित बाळासो भोसले यांनी तक्रार दिली आहे. संशयिताने आपल्या महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात महाराष्ट्र राज्य शासनाने जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून अधिसूचनेद्वारे प्रतिबंधित तंबाखू बेकायदा विक्रीसाठी बाळगलेला असताना ही कारवाई झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 06/Nov/2025














