Malgund : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे मालगुंड येथे उद्या पुरस्कार वितरण

गणपतीपुळे : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी साहित्यिक आणि साहित्येतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. हा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथील स्मारक संकुलात सकाळी ११. ३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक लाभणार असून महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कोमसापचे विश्वस्त उदय सामंत आणि ठाणे विधानसभेचे सदस्य तथा कोमसापचे विश्वस्त संजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती, तर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे पुरस्कार विरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आणि कोमसापचे विश्वस्त रेखा नार्वेकर, प्रा. एल. बी. पाटील, अनुप कर्णिक यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती कार्यक्रमच्या आयोजकांकडून देण्यात आली.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी आणि साहित्यिकप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ आणि कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 06/Nov/2025

Tata motars punch