ता. राजापूर (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्याच्या, विशेषतः राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिक्षणाची दारे खुली करणारा एक महत्त्वाचा उपक्रम सुरू होत आहे. वाटूळ येथील आदर्श विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज च्या माध्यमातून “रॅलीस सायन्स अकॅडमी, वाटूळ” (Rallys Science Academy, Watul) या नवीन शैक्षणिक पर्वाला सुरुवात होत आहे.
या अकॅडमीचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार विज्ञान शिक्षण देणे, त्यांना प्रयोगशील ज्ञानाची ओळख करून देणे आणि वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रातील कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी (NEET, JEE, MHT-CET) सक्षमपणे तयार करणे हा आहे.
केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर रोजगाराभिमुख शिक्षणालाही प्राधान्य देत, महाराष्ट्र शासनाचा मान्यताप्राप्त DMLT (Diploma in Medical Laboratory Technology) हा महत्त्वपूर्ण कोर्ससुद्धा या अकॅडमीमध्ये चालवला जात आहे.
अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये:
‘रॅलीस सायन्स अकॅडमी’मध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांच्या धर्तीवर शिक्षण मिळावे यासाठी खालील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत:
- विज्ञान क्षेत्रातील अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक वर्ग.
- अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज लॅबोरेटरी (प्रयोगशाळा) आणि डिजिटल क्लासरूम.
- NEET, JEE आणि बोर्ड परीक्षांसाठी विशेष व सखोल प्रशिक्षण वर्ग.
- विद्यार्थ्यांच्या तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी नियमित टेस्ट सिरीज (मॉक टेस्ट) आणि प्रॅक्टिकल सेशन्स.
- केवळ अभ्यासच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अँक्टिव्हिटी कार्यक्रमांचे आयोजन.
‘ग्रामीण विद्यार्थ्यांना समान संधी’ – अण्णा पवार
संस्थेचे प्रमुख श्री. अण्णा पवार यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली.
“आमचा प्रयत्न ग्रामीण भागातील एकाही विद्यार्थ्याला संधीअभावी मागे पडू न देण्याचा आहे. रॅलीस सायन्स अकॅडमीद्वारे ग्रामीण विद्यार्थ्यांनाही आता मोठ्या शहरांप्रमाणे दर्जेदार विज्ञान शिक्षणाची संधी त्यांच्याच परिसरात मिळेल आणि ते राष्ट्रीय स्तरावर नक्कीच यश संपादन करतील.”
प्रवेश प्रक्रिया सुरू
‘रॅलीस सायन्स अकॅडमी’चे औपचारिक उद्घाटन लवकरच मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली आहे. दरम्यान, शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, मर्यादित जागा असल्याने विद्यार्थ्यांनी व पालकांनी लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क:
- पवार सर: 9370898755 / 7387304333
- पत्ता: रॅलीस सायन्स अकॅडमी, आदर्श विद्यामंदिर परिसर, वाटूळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी.














