रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील नांदगाव-गोसावीवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या महिले विरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.४० वा. सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सुशांत चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महिला आपल्या घराच्या पडवीमध्ये बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची ९५० रुपयांची ९ लिटर दारू विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. महिलेविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 06/Nov/2025














