खेड : दाऊद इब्राहिमशी संबंधित तालुक्यातील मालमत्तांचा ४ नोव्हेंबरला होणारा नियोजित लिलाव स्थगित करण्यात आला. कायदेशीर वाद आणि प्रलंबित न्यायालयीन खटल्यांमुळे स्थगित करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
लिलावात एकूण चार मालमत्ता समाविष्ट असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी एक अमिना बी (दाऊद यांची आई) यांच्या नावावरची १७१ चौरस मीटर शेतजमीन समाविष्ट आहे. न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत आणि मालकीविषयक दाव्यांवर अंतिम निकाल येईपर्यंत हा लिलाव आयोजित केला जाणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 06/Nov/2025












