साखरपा : साखरपा देवरूख मार्गावर महावितरणने ३३ केव्ही वाहिनीसाठी नव्याने खांब टाकले आहेत. हे खांब अगदी रस्त्याकडेला बसवण्यात आले असल्याने अपघाताची शक्यता आहे. हे खांब तातडीने हटवावेत, अशी मागणी माजी सभापती जयसिंग माने यांनी केली आहे.
काही ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्टीवरच हे खांब बसविण्यात आले आहेत. मुरादपूर ते बावनदी पुलादरम्यान एक छोटा घाट उतार आहे. बावनदी पूल ते साखरपा दरम्यान सुमारे आठ किमीचा दुसरा घाट आहे. हा संपूर्ण रस्ता घाटाचा असल्यामुळे ठिकठिकाणी तीव्र वळणे आहेत. त्यामुळे अशा वळणांवर वेग नियंत्रित न झाल्यास वाहने सरळ खांबावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे माजी सभापती जयसिंग माने यांनी हे खांब तातडीने तिथून काढून महामार्गापासून काही अंतरावर उभे करावेत, असे म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 06/Nov/2025












