रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाज्यांची आवक कमी झाली आहे. भाजीपाल्यांने शंभरी ओलांडली असून अनेक भाज्यांची ३० रूपये पाव किलोने विक्री होत आहे. टोमॅटो, बटाटे, कांदा यांचे दर मात्र स्थिर आहेत. एकंदरीत भाजीपालांचे दर कडाडल्यामुळे महिलांचे किचनचे आर्थिक गणित बिघडले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. ऑक्टोबर महिना संपला तरी अद्याप काही ठिकाणी पाऊस पडतोय. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांना पावसाचा फटका बसल्यामुळे जिल्ह्यात आवक मंदावली आहे. टोमॅटो ३० रूपये किलो, अनेक भाज्यांची ३० रुपये प्रतिकिलोने होतेय विक्री ४ ते ५ किलो विक्री होत आहे. तर बटाटा १०० रूपये २ ते ३ किलो विक्री होत आहे.
जिल्ह्यात स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मुळा, मुठा, मेथी, मोहरी, चवळी या पालेभाज्यांची आवक सुरू झाली असून या भाज्या २० ते ३० रूपये जुडीने याची विक्री सुरू आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची, सिमला मिरची, कोबी, गवार यालाही मोठी मागणी वाढली आहे. एकंदरीत, अवकाळी पावसामुळे कोकणात जवळ जवळ सर्वच भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. दुसरीकडे मच्छी मार्केटमध्ये माशांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे महिलांचे किचनचे आर्थिक गणित बिघडल्याचे चित्र आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 06/Nov/2025












