साडवली : गत आठवड्यात पडलेल्या जोरदार अवकाळी पावसाने संगमेश्वर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील चोरवणे गावातील शेतकऱ्यांच्या भात व नाचणी शेताचे पंचनामे करण्यात येत आहेत.
सध्याच्या वातावरणातील सततच्या बदलमुळे शेतकरी वर्गासह सर्वच हैराण झाले आहेत. मात्र विशेषतः याचा फटका हा शेतकरी राजाला बसत आहे. यावर्षी ऐन दिवाळीच्या सणात, महत्त्वाचे म्हणजे या दिवसात थंडीचे वातावरण असते.
या कालावधीत अवकाळी पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री झाल्याने बळीराजाचे कापण्यायोग्य झालेले भातपीक पाण्यात गेले आहे. आंबा-काजू बागायतदारही पावसाचे हे बदलते चित्र पाहून चिंतेत पडल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनाम्याचे काम तालुक्यात सुरु झाले आहे. चोरवणे येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन तेथील कृषि सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलिस पाटील, गावचे सरपंच, उपसरपंच व गावातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे केले जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 06/Nov/2025














