मंडणगड ः मंडणगड शहरात वंदे मातरम् गीताच्या सार्धशती म्हणजेच १५० वर्षे महोत्सवाचे आयोजन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या क्रीडांगणावर उद्या (ता.७) सकाळी ९.३० ते १०.४५ या वेळेत हा सोहळा होणार आहे.
राज्यभरातील सर्व तालुक्यांमध्ये वंदे मातरम् या गीताचे सामूहिक गायन होणार असून, देशभक्तीची भावना जनमानसात दृढ करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कार्यक्रमात पद्मश्री दादा इदाते, प्रा. दिगंबर कुलकर्णी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाला शासकीय, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील आजी-माजी प्रशिक्षणार्थी, पालक, शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 06-11-2025












