First Houseboat in Kokan : कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरचा सुंदर ठिकाण आहे. कोकणातील निसर्ग, स्वादिष्ट अन्न आणि साधी-भोळी लोकं पर्यटकांना आकर्षित करतात. दाभोळ खाडीमध्ये पहिली हाऊसबोट कोकणातल्या जलपर्यटनाला एक नवा आयाम देणार आहे.
या हाऊसबोटमध्ये एकूण आठ खोल्या आहेत. महाराष्ट्रात इतक्या खोल्यांची ही पहिलीच हाऊसबोट आहे.
दाभोळ खाडीचे शांत आणि सुंदर दृश्य या बोटीवरून पाहता येईल. पर्यटकांना येथे आलिशान आणि आरामदायी अनुभव मिळणार आहे.
जवळच असलेल्या कांदळवनामुळे या प्रवासात नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून येईल. या हाऊसबोटवर कोकणी पारंपरिक पदार्थांची चवही घेता येईल.
सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हाऊसबोटमध्ये Deluxe आणि Suite अशा दोन प्रकारच्या रूम्स आहेत.
Deluxe रूमसाठी दोन व्यक्तींचे एक दिवसाचे दर 6,000 रुपये आहेत. Suite रूमसाठी दोन व्यक्तींचे दर 8,000 रुपये असून स्वतंत्र डेकची सोय आहे.
दोन्ही रूम्समध्ये तुम्हाला नाश्ता, चहा, दुपारचे व रात्रीचे जेवण मिळेल. ही हाऊसबोट कोकणातील पर्यटन वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
दाभोळ खाडीतील ही पहिली हाऊसबोट कोकणातील पर्यटनासाठी एक नवी ओळख ठरली आहे. यामुळे पर्यटकांना निसर्ग, शांतता आणि कोकणी संस्कृतीचा एकत्र अनुभव घेता येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 06-11-2025














