चिपळूण : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी व संबंधित मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देण्यासाठी चिपळूण नगरपालिका क्षेत्रातील सर्व राजकीय पक्षांची महत्त्वाची बैठक (ता. ७) सकाळी ११ वा. प्रांत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी निवडणुकीचा कार्यक्रम, आचारसंहितेची अंमलबजावणी, प्रचार मार्गदर्शक नियम, उमेदवारी अर्जप्रक्रिया तसेच मतदान केंद्रांबाबतचे नियोजन या संदर्भात सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व नियमानुसार पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी सुरू केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 07/Nov/2025














