Ratnagiri Abhyankar-Kulkarni College : ‘अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयाचे ‘राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात

रत्नागिरी : येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर कुर्धे येथील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिरात उत्साहात पार पडले. यावेळी आदर्श स्वयंसेवक म्हणून ऋग्वेद भोंडवलकर व वेदांगी नागले यांची निवड करण्यात आली.

शिबिराच्या समारोप कार्यक्रमास प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, शाळेचे माजी मुख्याध्यापक उदय फडके, कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील भोईर, प्रा. भूषण केळकर, प्रा. वैशाली यादव, प्रा. रिद्धी हजारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. अभिजीत भिडे, सूत्रसंचालन प्रा. रिद्धी हजारे व आभार प्रदर्शन प्रा. वैशाली यादव यांनी केले.

या शिबिरात पथनाट्य स्पर्धा विजेता वृंदावन गट; डॉजबॉल विजेता बाजीगर गट; उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा अनन्या गोरे (प्रथम), वैष्णवी कांबळे (द्वितीय), ऋग्वेद ठाकूर (तृतीय); सर्वोत्कृष्ट श्रमदान सार्थक कदम, मैथिली पवार; अष्टपैलू शिबिरार्थी ऋग्वेद ठाकूर, दीक्षा मोहिते; सर्वोत्कृष्ट गटनेता पर्णवी प्रभू देसाई; आदर्श मार्गदर्शक- हिंदवी कीर; सर्वोत्कृष्ट गट- बाजीगर गट सर्व विजयी स्वयंसेवकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देउन गौरवण्यात आले.

या निवासी शिबिरांतर्गत श्रमसंस्कारातून गणेशगुळे समुद्रकिनारा स्वच्छता, सर्वेश्वर व महाविष्णू मंदिर व शाळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच पथनाट्य कार्यशाळा-सुरेंद्र जाधव; सूत्रसंचालन कार्यशाळा-प्रा. सुप्रिया टोळये; व्यंगचित्र कार्यशाळा- योगेश हातखंबकर; कथाकथन कार्यशाळा- जयंत फडके तसेच डॉ. अक्षय फाटक यांनी सायबर संस्कार या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 07/Nov/2025