रत्नागिरी : शासनाच्या ज्या निवृत्तीवेतन धारकांना व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रदान केले जाते. त्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र १ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्र. शं. बिरादार यांनी केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांचे हयात प्रमाणपत्र विहीत मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्ती वेतन प्रदान केले जाऊ शकत नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी कोषागार कार्यालयाकडुन संबधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणा पत्रावर स्वःता हयात असल्याबाबत बँक व्यवस्थापक यांच्या समक्ष स्वाक्षरी करावी अशी घोषणापत्रे संबंधित बँकाकडे पाठविण्यात आली आहेत. पुर्ननियुक्त पुनर्विवाह केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांकरिता नियमित नमुना मनिऑर्डरदवारे निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांचे हयात दाखल्यांचे नमुने इत्यादी कोषागार कार्यालयाकडुन संबधित पत्त्यावर पाठविण्यात आले आहेत.
जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी ONLINE निवृत्तीवेतन तक्रार निवारण MODULE (Pension Grievance Redressal module) ही सुविधा निवृत्तीवेतनवाहिनी या प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निवृत्तीवेतन तक्रार निवारण module च्या माध्यमातून online पध्दतीने तक्रार दाखल करण्यासाठी अर्जदार/निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनी निवृत्तीवेतनवाहिनी मध्ये https://pension.mahakosh.gov.in/login.jsp या संकेतस्थळाचा वापर करुन login id: PENSIONER आणि Password : ifms123 वापरून Login करून otp पर्यायाचा वापर करून Grievance Registration मध्ये तक्रार नोदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या सुविधेमध्ये आपणास निवृत्ती वेतना संबंधिचा सर्व तपशिल उपलब्ध आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 07/Nov/2025














