रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथे घराच्या पहिल्या मजल्यावर खाली पडून जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुनाफ युसूफ मजगावकर (56, रा. मुसलमानवाडी गोळप, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये ते घराच्या पहिल्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून मेंदुत रक्तस्त्राव झाला होता. त्यांना अधिक उपचारांसाठी 23 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील विन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचारांदरम्यान 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. त्यांचा मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 08/Nov/2025












