Ratnagiri- Pawas Road : रत्नागिरी ते पावस रस्त्यावर गांजा विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावरील कोहीनूर हॉटेलच्या मागे गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ५ नाव्हेबर रोजी रात्री ९.५० वा. सुमारास करण्यात आली. मोहम्मद कैफ मुफीद भाटकर (२५, रा. जामा मस्जिदजवळ राजीवडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी रात्री संशयित हा आपल्या ताब्यात ६५०० रुपयांचा १२४ ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 08/Nov/2025