Science Exhibition : लांजात १०, ११ नोव्हेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञानप्रदर्शन

लांजा : केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘इन्स्पायर अॅवॉर्ड मानक’ या नव संकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे १० व ११ नोव्हेंबर रोजी लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयात लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीच्या नेतृत्वाखाली आयोजन केले आहे.

या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीसाठी नुकतीच जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा विज्ञान मंडळ पदाधिकारी, रत्नागिरी सिंधुदुर्गचे इन्स्पायर समन्वयक आणि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

या विज्ञान प्रदर्शनात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ‘इन्स्पायर अॅवॉर्ड, मानक’ ही योजना इयत्ता ६वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी १० हजारचे प्रोत्साहन अनुदान देते. देशभरातून निवडलेल्या एक लाख विद्यार्थ्यांना हे अनुदान दिले जाते.

या प्रकल्पांची निवड नंतर जिल्हास्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर केली जाते. या प्रदर्शनात पर्यावरण, कृषी, ऊर्जा, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांचा संगम पाहायला मिळणार आहे.

Gim trainer

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 08/Nov/2025