Chiplun- Sangameshwar Grampanchyat : चिपळूण, संगमेश्वरमधील ५ ग्रामपंचायतींना कोटीचा निधी मंजूर

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील ग्रामविकासाला नवी दिशा देणारे आणि आमदार शेखर निकम यांच्या सततच्या पाठपुराव्यास मोठे यश मिळाले आहे. मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून मतदार संघातील पाच ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींच्या बांधणीसाठी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीमध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे, निरबाडे व वोलोटी तसेच संगमेश्वर तालुक्यातील किरडुवे आणि फणसवळे या ग्रामपंचायतींच्या नवीन इमारतींच्या बांधणीचा या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाज अधिक सुसंघटित होण्यासाठी मदत मिळेल आणि जनतेसाठी सेवा-सुविधा अधिक सुलभ होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 08/Nov/2025

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!