रत्नागिरी : शहरातील मांडवी ते मिरकरवाडा रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्धाचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दीपक जगन्नाथ शिवलकर (६०, रा. भैरी मंदिर जवळ, रत्नागिरी) असे मृत प्रोढाचे नाव आहे. ही घटना गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७वा. सुमारास मांडवी रस्त्यावर घडली. गुरुवारी दीपक शिवलकर हे दुचाकी घेऊन मांडवी ते मिरकरवाडा असे जात असताना अपघात झाला. या अपघातामध्ये गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शहर पोलिस ठाण्यात अपघाताची खबर देण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 08/Nov/2025












