Deo Ghaisas, Keer College : देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये वंदे मातरम्’ चे समूह गायन

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने आज शुक्रवारी वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे १५० वे वर्ष साजरे केले. निमित्ताने महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धा व पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केली होती.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला अद्वितीय स्थान आहे. वंदे मातरम हे गीत देशभक्ती, स्वाभिमान व बलिदानाची भावना जागृत करणारे गीत आहे, असे या वेळी प्रा. मिथिला वाडेकर यांनी सांगितले. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन केले.

कार्यक्रमाला प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. वैभव घाणेकर, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. मिथिला वाडेकर, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर्या जाधव हिने केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 08/Nov/2025

cake of the day