मिरजोळे येथील शोरूममध्ये रंगणार अभंग आणि भक्तीगीतांची सुरम्य मैफील; स्थानिक कलाकारांचा स्वरसाज
Mai Hyundai Ratnagiri Event: रत्नागिरी :
आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून ‘माई ह्युंदाई, रत्नागिरी’च्या वतीने ‘भक्तीरंग’ या विशेष सांस्कृतिक आणि संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायातील पारंपारिक अभंग, भजन आणि भक्तीगीतांच्या सुश्राव्य सादरीकरणाने नटलेली ही सुरम्य मैफील उपस्थितांना भक्तीरसात चिंब भिजवणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक कलाकारांची लाभणार साथ
या कार्यक्रमात रत्नागिरीतील उदयोन्मुख गायक आदित्य लिमये आपल्या गायनाने स्वरसाज चढवणार आहेत. त्यांना वादक म्हणून तबल्यावर केदार लिंगायत, पखवाजावर पुष्कर सरपोतदार, ऑर्गनवर महेश दामले, व्हायोलिनवर उदय गोखले आणि तालवाद्यावर प्रथमेश घाटे साथसंगत करतील. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन दीप्ती आगाशे करणार आहेत.
कार्यक्रम स्थळ आणि सहकार्य
हा भक्तीमय कार्यक्रम माई ह्युंदाईच्या मिरजोळे (तालुका व जिल्हा रत्नागिरी) येथील शोरूममध्ये पार पडणार आहे. या उपक्रमाला ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ (LIC) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न
या उपक्रमाविषयी माहिती देताना माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे म्हणाले, “आम्ही केवळ वाहन विक्री व व्यवसायापुरते मर्यादित न राहता समाजातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा समृद्ध करण्याचे कामही करत आहोत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘भक्तीरंग’द्वारे आम्ही भक्ती आणि संस्कृतीचा जागर करत असून, मिरजोळे येथील शोरूममधील या कार्यक्रमाला रत्नागिरीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 23-07-2026














