Chiplun : कंबोडियातील जलव्यवस्थापनाची रहस्यमय तंत्रे’ यावर व्याख्यान

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात (ता. ८) सायंकाळी ६ वाजता ‘कंबोडियातील जलव्यवस्थापनाची रहस्यमय तंत्रे’ या विषयावर डॉ. अजित वर्तक हे दृक्श्राव्य संवाद साधणार आहेत. या निमित्ताने ‘लोटिस्मा’त कोकणच्या जलव्यवस्थापनाचा तौलनिक विचार केला जाणार आहे. कंबोडिया हा भारतीयांच्या आस्थेचा विषय आहे.

या व्याख्यानात कंबोडिया, अंकोर साम्राज्य, तिथली प्राचीन मंदिरे, संस्कृती, त्यांचे कोकण प्रदेशाशी असणारे साम्य, अंकोर साम्राज्याचा ऱ्हास अशा अनेक गोष्टींच्या औत्सुक्याला समाधानकारक उत्तरे नक्की मिळू शकणार आहेत. अंकोर साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि ऱ्हास याला कारण असणाऱ्या पाण्यासोबतच दगड, जमीन, हवामान, पाऊस या विषयांशी कंबोडियाचे कोकणाशी असणारे साम्य, कोकणाच्या भविष्यकालीन नियोजनासाठी नक्कीच दिशादर्शी असेल. कंबोडिया आणि कोकण याचा तौलनिक विचारही या व्याख्यानाच्या निमित्ताने होणार आहे.

या व्याख्यान कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरुण इंगवले, कार्यवाह धनंजय चितळे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 08/Nov/2025