Ratnagiri : आरोग्य विभागाच्या वतीने राज्य मानसिक व प्राथमिक आरोग्य सेवा कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्य मानसिक आरोग्य व प्राथमिक आरोग्य सेवा (७नोव्हेंबर)’ला संपन्न झाली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा येथील स्वयंवर सांस्कृतिक भवनात आज पार पडली.

या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अति. जिल्हा शल्य चिकीत्सक विकास कुमरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

कार्यशाळेमध्ये सकाळच्या सत्रात “प्राथमिक आरोग्य सेवा” यावर तर, दुपारच्या सत्रात “मानसिक आरोग्य सेवा” यावर चर्चासत्र आयोजित केले होते. सचिव श्री. विनायक यांनी आशा सेविका, तालुका वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधताना, त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या व आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांसंदर्भात मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्यासंबंधी लोकांमध्ये जागरुकता पसरविण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेत आरोग्य विभागाच्या विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचे विविध गट पाडून त्यांच्यात शासनाच्या आरोग्याविषयी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अनुभवाची देवाणघेवाण होण्यासाठी चर्चा घइवन आणली. या कार्यशाळेला वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी महत्त्वपर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 08/Nov/2025