Lanja : केळंबे वसुधानगर येथे जखमी बिबट्या जेरबंद

लांजा : लांजा तालुक्यातील केळंबे वसुधा नगर येथे जखमी अवस्थेत आढळून आलेल्या विवट्याला जेरबंद करण्यात यश आले. रविवारी दुपारी बिबट्याला वनविभाग लांजा पोलीस व स्थानिक नागरिकांच्या सहकायनि सुखरुप पकडण्यात आले.

या बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने तो जखमी झाला होता. रविवारी दुपारी केळंबे वसुधानगर येथे नागरिकांच्या नजरेस बिबट्या जखमी अवस्थेत दिसून आला. या घटनेची खबर मिळताच लांजा वनविभाग, पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या सहकार्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 10/Nov/2025