उमरे येथे रेल्वेची धडक बसून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील उमरे येथील ओव्हर ब्रिजवर रेल्वेची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास घडली. स्वरुप दयानंद कांबळे (३०, रा. उमरे कांबळेवाडी, रत्नागिरी) असे रेल्वेची धडक बसून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शनिवारी दुपारी स्वरुप कांबळे हे उमरे गावच्या ओव्हर ब्रिजवर गेले असताना त्यांना तेथील रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसची धडक बसली. यात ते गंभिर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मि मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 10/Nov/2025