Chiplun : चिपळुणातील मुत्तप्पन मंदिरात आज पुत्तेरी वेल्लाटम सण

चिपळूण : शहरातील राधाकृष्ण नगर, बहादूरशेख येथील श्री मुतप्पन मंदिरात १० नोव्हेंबर रोजी पुत्तेरी वेल्लाटम हा सण साजरा करण्यात येणार आहे. पुत्तेरी वेल्लाटम हा भात कापणीचा सण आहे. ज्यात नवीन धान्य कापल्यानंतर शिजवलेले पहिले अन्न देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात येते.

या उत्सवात विस्तृत विधी, पारंपरिक मेजवानी आणि लोककला यांचा समावेश आहे. उत्सवादरम्यान माजघरापासून सुरुवात करून दाराभोवती आणि पवित्र दिव्याभोवती शुभ आकृत्या काढल्या जातात. महिला पारंपरिक पदार्थ बनवतात जसे की कुठा करी (मिश्र भाजी करी), भाजी पुलाव आणि इंजी पज्जी (आले आणि नारळाची चटणी). चिपळूण येथील श्री मुत्तप्पन मंदिरात सोमवारी दुपारी १ वा. मल्लाईरक्कल, सायंकाळी ४ वा. वेल्लाटम, सायंकाळी ७ वा. महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुत्तप्पन सेवा समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 10/Nov/2025

tata motars