रत्नागिरी : शहरातील पेठकिल्ला येथील भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी ब्रेकवॉटर वॉल येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री ८.३० वा. सुमारास करण्यात आली.
हारून आकलीम सय्यद (१८, रा. मजगाव रोड कोकणनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री संशयित हा ब्रेकवॉटर वॉल येथील दगडावर बसून अमली पदार्थाचे सेवन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 10/Nov/2025














