Dapoli : पाजपंढरी येथील घरफोडीत पावणेचार लाखांची चोरी

दापोली : तालुक्यातील पाजपंढरी श्रीरामनगर येथील सुरेश चंद्रकांत चोगले यांच्या घरातून चोरट्याने रोख व सोन्याचे दागिने मिळून ३ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरून नेले. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

पाजपंढरी श्रीरामनगर येथील सुरेश चंद्रकांत चोगले यांच्या घरातून ३० ऑक्टोबरला सायंकाळी चारच्या सुमारास लाल रंगाची फायबर पेटी उघडून अज्ञात चोरट्याने ७ हजार रुपये रोकड व ३ लाख ५० हजाराचे ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सुरेश चोगले यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 10/Nov/2025

cake of the day