रत्नागिरी : निवसर-मळेवाडी (ता. लांजा) येथे चोरट्याने दोन ठिकाणी घरफोडी करुन ४४ हजार रुपयांची रोख रक्कम पळविली. लांजा पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी व शनिवारी (ता. ८) सकाळी साडेआठच्या सुमारास निवसर मळेवाडी येथे उघडकीस आली.
फिर्यादी राजेंद्र केशव शिंदे (वय ३७, रा. निवसर मळेवाडी, ता. लांजा) यांच्या घराला लागून महादेव सदू शिंदे यांचे घरामध्ये असलेले कपाटात लॉकरमध्ये ठेवलेले ४ हजार व शंकर शांताराम शिंदे यांच्या घरातील कपाटात ठेवलेले ४० हजार रुपये लॉकर तोडून चोरट्याने पळविले. या प्रकरणी राजेंद्र शिंदे यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लांजा पोलिस ठाणे अमंलदार करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 10/Nov/2025













