Accident : टाळसुरे शेलारवाडीत मोटारीची रिक्षाला पाठीमागून धडक

दापोली : दापोली-खेड महामार्गावरील टाळसुरे शेलारवाडी परिसरात रविवारी (ता. ९) दुपारी झालेल्या भीषण अपघातात मोटारीने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा रस्त्याच्या कडेला कलंडली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर मोटारचालकाने पलायन केले.

रिक्षाचालक सुचित भाटकर यांच्या सांगण्यानुसार, ते दापोलीकडून खेडच्या दिशेने रिक्षा घेऊन जात होते. त्यावेळी पाठीमागून वेगात आलेल्या मोटारीने रिक्षाला धडक दिली. त्यामुळे भाटकर बाहेर फेकले गेले. मात्र सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रिक्षा बाजूस करून रस्ता मोकळा केला. दरम्यान, मोटारचालकाने गाडी घेऊन तत्काळ पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पळून गेलेल्या मोटारचालकाचा शोध घेतला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 10/Nov/2025

tata motars