Lanja : डांबर-खडीवाहू वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटून अपघात

लांजा : डांबर-खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटून डंपरला झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथील अन्ने विद्यानिकेतन हायस्कूलसमोर घडली.

या अपघातात जखमी डंपर चालक असुद्दीन याला लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डंपर (क्रमांक एम एच ०५, ईएल ०८९६) डांबरमिश्रित खडी घेऊन लांजा ते पालीच्या दिशेने निघाला होता. डंपर मुंबई-गोवा महमार्गावर देवधे येथील अन्ने विद्यानिकेतन हायस्कूल येथे आला असता डंपरच्या डाव्या बाजूचा पुढील टायर फुटला. त्यामुळे डंपरवरील चालकाचा ताबा सुटला. मात्र वाहनावर नियंत्रण आणून डंपर महामार्गाच्या बाजूच्या मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन धडकला. डंपर कलंडल्याने डंपरमधील खडी महामार्गावर पडली. जखमी चालकाला लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 10/Nov/2025