Mandangad : सार्वजनिक रस्त्यावर टेम्पो पार्क; चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील वेसवी ते वेळास जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने टेम्पो पार्क करणाऱ्या चालकाविरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास करण्यात आली.

अमोल मारुती ओवाळ (वय ४४, रा. वरची आळी मु. वरखवाडी, ता. वाई, जि. सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पवार यांनी तक्रार दिली आहे. शुक्रवारी दुपारी अमोल ओवाळेने वेसवी ते वेळास जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली होती. त्यामुळे इतर वाहनांना तसेच पादचाऱ्यांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 10/Nov/2025

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!