परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : शहरातील परटवणे येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला, ही घटना ६ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४७ वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. संतोष एकनाथ पाटील (व ५६, रा. परटवणे साई मंदिर, रत्नागिरी) असे आकस्मिक मुत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत त्यांचा भाऊ सुरेश पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. गुरुवारी सकाळी ते रहात असलेल्या घराच्या पडवीच्या बाहेर बेशुध्द अवस्थेत पडलेल त्यांच्या पुतण्याला दिसून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी संतोष पाटील यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 10/Nov/2025

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!