Ratnagiri : एन.सी.सी. ‘मेनू २०२५’ कॅम्पला सुरुवात

रत्नागिरी : २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी आणि ए.आय.सी. कॅम्पिंग ओएनआर आर. पी. गोगटे कॉलेज कॅम्पस, रत्नागिरी येथे ब्रिगेडिअर आर. के. पैठणकर, ग्रुप कमांडर, एन. सी. सी. ग्रुप हेडक्वार्टर, कोल्हापूर यांच्या हस्ते ‘मेनू २०२५’ (Most Enterprising Naval Unit) कॅम्पला नुकतीच सुरुवात झाली आहे.

१० नोव्हेंबर २०२५ ते १९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नॅशनल स्तरावरील हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्याला ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर आर. के. पैठणकर आणि कॅप्टन जयंत जॉर्ज, डेप्युटी डायरेक्टर (नौसेना), एनसीसी डायरेक्टोरेट महाराष्ट्र, मुंबई, यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ब्रिगेडिअर आर. के. पैठणकर यांनी सहभागी अधिकारी व कॅडेट्सना मार्गदर्शन केले.

या शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) कॅडेट्स सहभागी झाले आहेत. कमांडर रामानुजम दीक्षित, कमांडिंग ऑफिसर, २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॅम्प आयोजित करण्यात आले आहे. कॅम्पमध्ये एकूण २१ अधिकारी (०२ नौसेना अधिकारी, ०२ एन. सी. सी. अधिकारी, १० नौसेना स्टाफ, ०२ श्रमसेना स्टाफ, ०८ गव्हर्नमेंट कॅडेट इंस्ट्रक्टर, आणि ०८ शासकीय कर्मचारी) तसेच ५० राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुली या प्रशिक्षणात भाग घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:55 PM 10/Nov/2025