फेक लिंकचा दापोलीत फैलाव; मोबाईल हॅकिंगचा संशय

दापोली : दापोलीत गेल्या दोन दिवसांत फेक लिंकचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत असून, अनेक नागरिकांच्या मोवाईलवर एकाच स्वरूपाचा संदेश आल्याची माहिती मिळाली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईलची गती मंदावते, तसेच ही लिंक आपोआपच वापरकर्त्याच्या ग्रुप आणि वैयक्तिक कॉन्टॅक्टवर पाठवली जाते, अशी तक्रार नागरिकांकडून समोर आली आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, ही लिंक फिशिंग किंवा मालवेअर लिंक असू शकते. ती उघडल्यास मोबाईलमधील वैयक्ति क माहिती, संपर्क, फोटो, आणि आर्थिक अॅप्सची माहिती हॅक होण्याचा धोका आहे.

त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, प्राप्त झालेली फेक लिंक त्वरित डिलीट करा, मोबाईल स्कॅन करून संशयास्पद अॅप्स हटवा, सर्व महत्त्वाचे पासवर्ड बदला आणि २-फॅक्टर सुरक्षा सक्रिय करा, असा सावधगिरीचा सल्ला नागरिकांना दिला आहे. दापोली पोलिसांनी नागरिकांना अशा फेक लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, कोणताही संशयास्पद संदेश पुढे न पाठवण्याची सूचना दिली आहे.

मोबईलवर अनेक दिवस फिरत असलेली फेक लिंक https://meesho .com@mesxek.cyou?id= 251110065624

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 11/Nov/2025