Gram panchayat : राजापूर मतदार संघातील ६ ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर

साखरपा : शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत राजापूर विधानसभा मतदार संघातील ६ ग्रामपंचायतींसाठी इमारत निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आमदार किरण सामंत यांनी प्रयत्न केले होते.

राजापूर विधानसभा मतदार पंघातील ज्या ग्रामपंचायतींना इमारत नाही त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत इमारत बांधणी निधी दिला जातो. राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघातील ६ ग्रामपंचायतींना हा निधी मंजूर झाला आहे.

राजापूर तालुक्यातील आजीवली, दोनिवडे, वडदहसोळ लांजा तालुक्यातील खोरनिनको, मठ तर संगमेश्वर तालुक्यातील देवडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यापैकी मठ ग्रामपंचायतीसाठी २५ लाख तर अन्य पाच ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच त्या सहा गावांचा कारभार स्वतःच्या हक्काच्या इमारतींमधून सुरू होणार आहे. त्या सहा गावांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 11/Nov/2025

cake of the day