Ratnagiri : नमन लोककला जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर कांबळे यांची बिनविरोध निवड

चिपळूण : नमन लोककला रत्नागिरी जिल्हा या मातृसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सिद्धगिरी मंगल कार्यालय येथे झाली. नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रभाकर ऊर्फ पी. टी. कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. सचिवपदी रवींद्र कोटकर आणि खजिनदारपदी अॅड. संतोष कुळे यांची बिनविरोध निवड झाली.

नमन लोककलेला चालना देण्यासाठी आणि नमन लोककलेचा वारसा पुढच्या पिढीला देण्याच्या उद्देशाने नमन कलेतील मातृसंस्था स्थापन करण्यात आली आहे. नुकतीच संस्थेची वार्षिक पार पडली. या सभेत नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.

यामध्ये उपाध्यक्षपदी मोहन घडशी, सहसचिवपदी चंद्रशेखर पांचाळ, तर सदस्य संजय भागडे, भिकाजी भुवड, तानाजी गुडेकर, संजय पेजले, संजय बुरटे, सुनील गांगरकर, तानाजी दोरखंडे, विलास भातडे, विश्वनाथ गावडे, श्रीधर खापरे, हरिश्चंद्र बडंबे, चंद्रकांत पालकर, मुकुंद बावकर, शिवाजी मासये यांना संधी देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 11/Nov/2025