संगमेश्वर : ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा संगमेश्वर येथील श्री देव कालभैरव जोगेश्वरी (भैरीभवानी) मंदिरात, प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रींचा प्रकटदिन उत्साहात साजरा होणार आहे. मंदिर न्यासाच्या वतीने ११ व १२ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
११ रोजी सकाळी ७ वा. अभिषेक व पूजा, त्यानंतर सकाळी ८.३०, दुपारी १२.३० व सायंकाळी ६.३० वाजता आरत्या होतील. रात्री ९ वा. ‘स्वरसंगम कलामंच, कसबा’ यांचे अभंग गायन होईल. १२ रोजी सकाळी ७ वा. रुद्राभिषेक व पूजा, ८.३० वा. आरती, तर १० वा. ह.भ.प. संतोष पित्रे यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२.४० वा. श्रींचा जन्मोत्सव, महाआरती व मंत्रपुष्पांजली, त्यानंतर १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन आहे. दुपारी ३ वा. स्वामिनी महिला मंडळ, संगमेश्वर यांचे भजन, सायं ६ वा. श्रीधर पाटणकर व सहकारी यांची अभंग व नाट्यसंगीत मैफील, रात्री ८.३० वा. आरती, ९ वा. बोंडकर-सप्तीसकर व सहकारी यांचे स्थानिक भजन आणि रात्री ११ वाजता विश्वस्त व कार्यकर्त्यांचे जागरण भजन होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 11/Nov/2025













