दापोली : दापोली तालुक्यातील जालगाव चोरगेवाडी येथे दारूच्या नशेतून दुकानात घुसून तोडफोड तसेच शिवीगाळ करत धमकावल्याची घटना घडली असून या प्रकरणी दोन जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना ५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली.
या प्रकरणी केतन एम. के. (वय ३५, रा. जालगाव चोरगेवाडी) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राहुल गोपीदास आणि त्याचा साथीदार जायजू (पूर्ण नाव उपलब्ध नाही) हे दोघेही दारूच्या नशेत तक्रारदार यांच्या दुकानात आले. त्यावेळी त्यांनी कोणत्याही कारणास्तव शिवीगाळ करत दुकानातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच दरम्यान राहुल गोपीदास यांनी तक्रारदारास फोन करून अश्लील भाषा वापरत जीवितास धोका होईल अशा धमक्या दिल्याचेही समोर आले आहे.
या तक्रारीच्या आधारे दापोली पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर ४७६/२०२५ नुसार बी. एन. एस. कलम ३२४ (४), ३५१ (४), ३५२.३(५) अंतर्गत नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार सपोफी/७२७गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास सुरू असून आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 11/Nov/2025














