रत्नागिरी : मुरूगवाडा येथील श्रीदेव भेरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदुकेश्वर ट्रस्टतर्फे कालभैरव जयंती विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात येणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या उत्सवासाठी स्थानिक भक्त, गावकरी तसेच परिसरातील भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या दिवशी सकाळी ७.३० वा. बारा वाड्यांच्या वतीने श्रीदेव भैरीवर अभिषेकाने विधीला सुरुवात होणार आहे. ८ वा. सत्यनारायण पूजेचा प्रारंभहोईल. ८.३० वा. कालभैरव याग (होमहवन) पार पडणार असून, ९ वा. सामूहिक कालभैरवव्रत पठण दिंडोरी प्रतिष्ठानचे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे (नाचणे) यांचे भक्त करतील.
उत्सवात दिवसभर विविध भजन मंडळांच्या सुमधुर कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना लाभणार आहे. दुपारी २ ते ३ या वेळेत श्रीराम प्रासादिक भजन मंडळ (शिरसे राजापूर, बुवा संतोष शिरसेकर), ३ ते ४ या वेळेत स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ (आंबेशेत, बुवा शुभम वायंगणकर), सायं. ६ ते ८ दरम्यान कृपासिंधू प्रासादिक भजन मंडळ (वेळणेश्वर, तळवली, बुवा कौशल पिलणकर), रात्री ८ ते १० या वेळेत कालभैरव प्रासादिक भजन मंडळ (मुरूगवाडा, बुवा दीपक पिलणकर) यांचे भजन होईल.
समारोपाच्या सत्रात रात्री १० ते १२ या वेळेत श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ (घुडेवठार, बुवा सुदेश नागवेकर) यांचे भजन होईल. रात्री १२ वा. आरतीने जयंती कार्यक्रमाची सांगता होईल. याचबरोबर दुपारी १२ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत खिचडी प्रसाद देण्यात येणार असून याचा सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 12/Nov/2025













