देवरुख : देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अर्ज भरणा कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. महायुती, महाआघाडी व अन्य संघटनांच्या आघाड्या या निवडणूक रिंगणात उतरत आहेत. यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांची गर्दी सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे.
पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्यावरच प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया असते. पक्षांकडूनच उमेदवारांची नावे जाहीर न झाल्यामुळे उमेदवारी अर्ज देखील रखडले आहेत. महाविकास आघाडी कडून नगराध्यक्ष व ७नगरसेवकांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडी कडून एकाच दिवशी सर्व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महायुतीत युती होणार की नाही हा संभ्रम असल्यामुळे या ठिकाणीही उमेदवारी निश्चित झालेली नाही. यामुळे युतीमधूनही अर्ज भरणा झालेला नाही. अन्य संघटना वेट अँड वॉच मध्ये आहेत. या संघटना ठराविक प्रभागांमध्ये समोरील उमेदवार पाहूनच आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत. यामुळे अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 12/Nov/2025













