Accident : खरवते येथील तीव्र उतारात दुचाकी घसरुन वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील खरवते येथील तीव्र उतारातील वळणातील दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. सुमारास घडली. संजय सखाराम सनगरे (६०, रा. कोतवडे, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी सुर्यकांत जयदेव वारेकर (५०) हे संजय सनगरे यांच्या सोबत कोतवडे येथील महालक्ष्मी मंदिरात देवभेटणेचा कार्यक्रम आटोपल्यावर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-बीए-०७०६) वर पाठीमागे संजय सनगरे यांना बसवून खरवते येथे जात होते. ते खरवते वत येथील तीव्र उतारातील वळणावर आले असता सूर्यकांत वारेकर यांचा दुचाकीवारील ताबा सूटला त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाला. यात संजय सनगरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंदण्याची कार्यवाही सुरू होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 12/Nov/2025