रत्नागिरी : गोव्यातून बेलापूरला निघालेले बार्ज तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ते रत्नागिरी तालुक्यातील बंदरामध्ये भरकटल्यामुळे परिसरामध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु तातडीने त्याबाबत चौकशी केल्यानंतर तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळेच भरत भरकटले असल्याचे सिद्ध झाले परंतु त्यानंतर बेलापूरच्या दिशेने मार्गस्थ होईल, अशी अपेक्षा असताना गेली पाच महिने आहे त्या स्थितीमध्ये असल्यामुळे शंका निर्माण झाली होती परंतु आता त्याचे काम पूर्णत्वास गेले असून आठ दिवसात बेलापूरच्या दिशेने मार्गस्थ होण्याचे शक्यता निर्माण झाली आहे
गोव्यातून बेलापूरला जाण्यासाठी बार्ज, टग ब होडी निघालेले असताना पाच जून रोजी त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने त्याने रणपार बंदरामध्ये आसरा घेतला परंतु सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याबाबत तातडीने हालचाली चौकशीच्या सुरू करण्यात आल्या कारण किनाऱ्यावरती वेगवेगळी कारणे सांगून दहशतवादी कारवायाच्या दृष्टीने हालचाली होऊ शकतात त्या
पार्श्वभूमीवर तातडीने गस्त घालून त्याची चौकशी करण्यात आली व त्यानंतर संबंधित मालकाशी संपर्क केल्या नंतर त्या संदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर अखेर सागरी किनाऱ्यावरील या सुरक्षितेच्या दृष्टीने विश्वास टाकला परंतु त्यानंतर त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती परंतु त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यामुळे त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले होते त्यात अडकलेले कामगारांना संबंधित मालकाने बाहेर काढून आपल्या भागात घेऊन गेले होते मात्र काही ठराविक जण त्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले अखेर पाच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर त्या बार्ज ची दुरुस्ती करण्यात आल्याचे खात्रीलायक रिक्त असून येत्या आठ दिवसांमध्ये भरतीच्या काळा वेळा ठरवून ते बेलापूरला मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.
बार्जची चांगल्याप्रकारे दुरुस्ती
या बार्जचे व्यवस्थापक चेतन डोईफोडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, या बार्जची तांत्रिक अडचण दूर करून ते चांगल्याप्रकारे दुरुस्त करण्यात आले असून येत्या आठ दिवसांमध्ये बेलापूरला नेण्यात येणार आहे असे सांगितले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांची समस्या संपुष्टात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 12/Nov/2025













