Ratnagiri : दारूसाठी लागणारा गुळ, नवसागर मिश्रित मुद्देमालावर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथील नदीकिनारी जंगलमय भागात गावठी दारूसाठी लागणारे गुळ व नवसागर मिश्रित रसायन व इतर साहित्य अशा एकूण २६ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमालावर शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी ७.१५ वा. सुमारास कारवाई केली.

संदेश गणपत जाधव (५३, रा. मिरजोळे, बौद्धवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल उमेश पवार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा मिरजोळे पाटीलवाडी येथील नदी किनारी जंगलमय भागात बेकायदेशिरपणे हातभट्टीची दारु बनवण्यासाठी गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे २०० लिटर गुळ नवसागरमिश्रित कुजके रसायन व इतर हातभट्टीचे साहित्य बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 12/Nov/2025