दापोली ः तालुक्यातील कोंढे, बोबले-शिगवणवाडी परिसरात लक्ष्मण धर्माजी बोबले (रा. बोबले-शिगवणवाडी) यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना ९ नोव्हेंबरला सायंकाळी घडली.
बोबले हे नेहमीप्रमाणे कळपातील शेळ्या जंगलालगतच्या मोकळ्या चराई भागात चारत होते. त्या वेळीच बिबट्याने शेळीवर झडप घातली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बोबले यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता बिबट्या पळाला; परंतु त्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली. वनविभागाने पंचनामा करून शासनाकडून नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी बोबले यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 12-11-2025













